RTI : Maharashtra

गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे पोर्टल, ज्यायोगे तुम्हाला व्यक्तीश: ओळखणे आम्हाला शक्य होते अशी (नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा इ-मेल पत्ता यांसारखी) कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती तुमच्याकडून आपोआप हस्तगत करत नाही.
 
हे पोर्टल, आपल्या भेटींची नोंद ठेवते आणि सांख्यिकी प्रयोजनांसाठी, आंतरजाल शिष्टाचार (इंटरनेट प्रोटोकॉल) पत्ते, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, कार्यचालन यंत्रणा (ऑपरेटिंग सिस्टिम ), भेटीची तारीख व वेळ आणि पाहिलेली पृष्ठे यांसाखी माहिती नोंदवते
 
जोपर्यंत आमच्या संकेतस्थळाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न होत नाही तोपर्यंत, संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीशी या पत्त्याचा दुवा जोडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही. जेव्हा कायदा अंमलबजावणी अभिकरण, सेवा पुरवठादाराच्या नोंदींची तपासणी करण्याच्या अधिपत्राचा वापर करील त्याखेरीज अन्य बाबतीत आम्ही, वापरकर्ते अथवा त्यांच्या ब्राउझर विषयक कृतींचा शोध घेणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलने वैयक्तिक माहिती पुरविण्याची तुम्हाला विनंती केली तर, जर तुम्ही ती देण्याची निवड केली तर, ती कशी वापरण्यात येईल याची माहिती तुम्हाला देण्यात येईल आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याकरिता पर्याप्त असे संरक्षक उपाय योजना हाती घेण्यात येतील.