RTI : Maharashtra

अतिसंलग्नताकारी (हायपरलिंक) धोरण

बाह्य संकेतस्थळे / पोर्टल यांचे दुवे (लिंक)
या पोर्टलमध्ये अनेक ठिकाणी, अन्य शासकीय, अ-शासकीय / खाजगी संघटनांनी तयार केलेल्या व ठेवलेल्या इतर संकेतस्थळांसाठीचे / पोर्टलसाठीचे दुवे तुम्हाला पहावयास मिळतील. हे दुवे तुमच्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. जेव्हा तुम्ही एखादा दुवा (लिंक) निवडतात, तेव्हा, तुम्हाला ते संकेतस्थळ शोधता येते. एकदा तुम्ही त्या संकेतस्थळावर गेलात की मग, तुम्हाला त्या संकेतस्थळाच्या मालकांच्या / पुरस्कर्त्यांच्या गोपनीयता व सुरक्षितता विषयक धोरणांच्या अधीन राहावे लागते. महाराष्ट्र शासन, दुवा देण्यात आलेल्या अशा संकेस्थळावरील आशय व विश्वसनीयता यांसाठी जाबाबदार असणार नाही, आणि त्यांमध्ये व्यक्त केलेल्या मतांना आवश्यक पुष्टी देत नाही. या पोर्टलवरील दुव्याच्या किंवा त्यांच्या सूचीच्या केवळ उपस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची पुष्टी देण्यात आल्याचे गृहीत धरता कामा नये.
 
 
अन्य संकेतस्थळांकडून / पोर्टलकडून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला दिलेले दुवे (लिंक्स)
आमच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीशी थेट दुवा जोडणी (दुवा) करण्यासाठी आम्ही तुमच्यावर हरकत घेत नाही आणि त्याकरिता कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता असणार नाही. तुमच्या संकेस्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे दाखल करण्यास आम्ही परवानगी देत नाही. आमच्या विभागाची पृष्ठे, वापरकर्त्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या ब्राउझर विंडोमध्येच दाखल केली पाहिजेत.