RTI : Maharashtra

उपलब्ध असलेल्या सुविधांचे निवेदन

वापरातील साधन, तंत्रज्ञान किंवा त्याची क्षमता विचारात न घेता सर्व वापरकर्त्यांसाठी “माहितीचा अधिकार : महाराष्ट्र शासन” हे पोर्टल याची खात्री करण्यास आम्ही बांधील आहोत. त्याच्या वापरकर्त्यांना अधिकाधिक सुगमता व उपयुक्तता पुरवण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे. परिणामी, हे पोर्टल, आंतरजालक्षम भ्रमणध्वनी साधने, व्हीएपी (WAP) दूरध्वनी, पीडीए आणि अशा प्रकारच्या विविधांगी साधनांमधून पाहता येईल.
 
या पोर्टलवरील सर्व माहिती दिव्यांग व्यक्तींना सुगम होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, दृष्टी-दिव्यांग वापरकर्ता स्क्रीन रिडर्स व मॅग्नीफायर्स यांसारख्या सहाय्यकारी तंत्रज्ञानाचा वापर करुन या पोर्टलवर पोहोचू शकतो.
 
या पोर्टलच्या वापरकर्त्यांना जे मदतगार ठरेल अशा मानकांचे अनुपालन करणे आणि वापरक्षमता व सार्वत्रिक संरचना यांच्या तत्वाचे पालन करणे हे देखील आमचे ध्येय आहे. या पोर्टलच्या सुगमतेबाबत तुमच्या काही समस्या किंवा सूचना असतील तर, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 

सुगमता वैशिष्ठये

  • मुख्य मजकुराकडे वळा: कळफलक (कीबोर्ड) वापरुन पुन्हा पुन्हा शोधप्रक्रियेतून न जात पृष्ठावरील केंद्रभूत मजकुरापर्यंत जलद गतीने प्रवेश करण्याची सुविधा या पृष्ठावर (पेजवर) दिलेली आहे.
  • शोधप्रकियेकडे वळा: नागरिक, शासन व निर्देशिका यांसारख्या विविध विभागांपर्यत पोहोचणे शक्य होण्यासाठी जलद प्रवेशाची शोधप्रक्रिया खिडकी दिलेली आहे.
  • सुगमता पर्याय: मजकुराचा आकार बदलण्याचे व रंगयोजना निश्चित करण्याचे पर्याय पुरविण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही या पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी डेस्कटॉपचा वापर करत असाल तर, पडद्यावरील अक्षरे लहान दिसू शकतात जी वाचावयास कठीण जातात. अशा परिस्थितीमध्ये स्पष्ट दृश्यमानतेसाठी व अधिक चांगल्या वाचनक्षमतेसाठी अक्षरांचा आकार वाढवण्याकरिता हा पर्याय तुम्ही वापरु शकता.
  • तक्त्याची शीर्षे: तक्त्याची शीर्षे चिन्हित केलेली आहेत आणि प्रत्येक ओळीतील त्यांच्या संबंधित कोष्ठाशी (सेल) ती सहयोगी आहेत, उदाहरणार्थ, जर एका तक्त्यामध्ये 30 ओळी आणि 5 स्तंभ असतील तर, दृष्टी - दिव्यांग वापरकर्त्याला कोणता आधार सामग्री कोष्ठ (सेल) कोणत्या शीर्षाशी संबंधित आहे हे ओळखणे कठीण जाते. अशा परिस्थितीत, पडदा वाचक (स्क्रीन रीडर) सारख्या सहाय्यकारी उपकरणामुळे वापरकर्त्याला कोणत्याही कोष्ठाचा स्तंभ शीर्ष वाचता येणे शक्य होते. याशिवाय प्रत्येक तक्त्याकरिता मथळेदेखील विनिर्दिष्ट केलेले असून ते खूणचिठ्ठीचे (लेबल) काम करतात आणि तक्त्यामध्ये कोणती आधारसामग्री पुरविलेली आहे ते दर्शवितात.
  • शीर्षे: वाचनक्षम संरचना पुरविणाऱ्या उचित शीर्षांचा व उपशीर्षांचा वापर करुन आंतरजालाच्या पृष्ठावरील (वेब पेजवरील) मजकुराची रचना केलेली आहे. एच 1 मुख्य शीर्ष दर्शविते तर, एच 2 उपशीर्ष दर्शविते. याशिवाय, पडदा वाचक (स्क्रीन रीडर) वापरकर्त्यांसाठी अधिक चांगल्या वाचनक्षमतेसाठी जी पडदा वाचकांकडून वाचली जातात अशी लपलेली (छुपी) शीर्षे या पोर्टलवर आहेत.
  • शीर्षके: प्रत्येक आंतरजाल पृष्ठाकरिता एक समुचित नाव विनिर्दिष्ट केले जाते, जे पृष्ठावरील आशय सहजपणे समजण्यास तुम्हाला मदत करते.
  • एकांतरित मजकूर: दृष्टी-दिव्यांग वापरकर्त्यांसाठी प्रतिमेचे संक्षिप्त वर्णन दिलेले आहे. जर तुम्ही फक्त मजकुराला आधारभूत ठरणारे ब्राऊजर वापरत असाल किंवा प्रतिमा प्रदर्शन (इमेज डिस्प्ले) बंद केलेले असेल तर, प्रतिमा नसतांनाही एकांतरित मजकूर वाचून ती प्रतिमा काय आहे याविषयी तुम्हाला सर्व काही जाणून घेता येऊ शकते.
  • सुव्यक्त नमुना सहयोगी खूणचिठ्ठी: मजकूर चौकट, तपासणी चौकट रेडिओ बटण व दिलेली सूची (ड्रॉप-डाऊन लिस्ट) यांसारख्या तिच्या संबंधित नियंत्रणाशी खूण चिठ्ठी (लेबल) जोडलेली आहे. यामुळे सहाय्यकारी उपकरणांना नमुन्यावरील नियंत्रणाच्या खूणचिठ्ठया ओळखणे शक्य होते.
  • सुसंगत शोधप्रक्रिया यंत्रणा: सादरीकरणाची सुसंगत शैली, संपूर्ण पोर्टलमध्ये अंतर्भूत केली आहे.
  • कळफळक आधार: टॅब आणि शिफ्ट + टॅब टी कळ दावून त्याद्वारे कळफलकाच्या वापर करुन पोर्टलचा शोध घेतला जाऊ शकतो.
  • पारंपरिक मजकूर आकार: संकेत (वेब) पृष्ठावरील मजकुराचा आकार, एकतर ब्राऊझर ने किंवा सुगमता विकल्प वैशिष्टयाद्वारे बदलता येऊ शकतो
  • स्वतंत्र जावा लिपी: लिखित भाषेच्या ब्राऊझरचा आधार लक्षात न घेता, संकेत पृष्ठावरील (वेब पेजवरील ) माहिती व कार्यशिलता जावा लिपीपासून स्वतंत्र आहे.
  • सुगमता विकल्प

    पडद्यावरील मजकूर वाचणे तुम्हा अवघड जाते का ?
    प्रदर्शित माहिती तुम्हाला स्पष्टपणे दिसत नाही का ?
    असल्यास, पडद्यावरील प्रदर्शन नियंत्रित करण्यासाठी या पोर्टलद्वारे दिलेल्या सुगमता विकल्पाचा वापर करा. स्पष्टपणे दिसण्यासाठी व अधिक चांगल्या वाचनक्षमतेसाठी हे विकल्प, आकार व रंगयोजना बदलण्याची मुभा देतात.

    मजकुराचा आकार बदलणे

    मजकुराचा आकार बदलणे म्हणजे मजकुराच्या प्रमाणित आकारापेक्षा मजकूर लहान किंवा मोठा करणे होय. मजकुराची वाचनीयता परिणामक होईल असा आकार ठरवण्यासाठी तुम्हाला तीन विकल्प दिलेले आहेत, ते असे आहेत:
     
    सर्वात मोठा: सर्वात मोठया अक्षरांच्या आकारात (फाँट साईझ) माहिती प्रदर्शित केली जाते.
    मोठा: अक्षराच्या प्रमाणित आकारापेक्षा मोठया आकाराच्या अक्षरांमध्ये माहिती, प्रदर्शित केली जाते.
    माध्यम: जो मूळ आकार आहे अशा प्रमाणित आकाराच्या अक्षरांमध्ये माहिती प्रदर्शित केली जाते.
     
    मजकुराचा आकार बदलण्यासाठी कोणत्याही पृष्ठाच्या वरच्या बाजूस असलेल्या मजकूर आकार चौकोनावर ( टेक्स्ट साईझ आयकॉनवर) क्लिक करा